बातम्यामहाराष्ट्र

पञकारांवर हल्ला केल्यास ३ वर्ष कैद, विधानसभेत चर्चेविना विधेयक मंजूर


मुंबई (वास्तव संघर्ष) पञकारांवर वाढते हल्ले लक्षात घेऊन पञकार आणि पसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले आहे. यानुसार आता पञकार आणि माध्यमांवर हल्ला तीन वर्षाचा कारावास किंवा ५० हजार रुपए दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे.

तसेच पञकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे. महाराष्ट्र प्रसारण माध्यमातील व्यक्ति आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी याला प्रतिबंध) अधिनियम २०१७ या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.

Share this: