बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वासुली फाटा येथे नव्याने पोलीस चौकी स्थापन करा ;सभापती उत्तम केंदळे यांची पोलीस आयुक्तांना मागणी

स्व तानाजीभाऊ केंदळे प्रतिष्ठाणची पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना वासुली फाटा(खेड)येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चाकण पोलीस स्टेशन अंकित म्हाळुंगे पोलिस चौकी आता नव्याने म्हाळुंगे पोलीस स्टेशन येत्या महिन्यात होत आहे. तरी वासुली फाटा (ता खेड) येथे नव्याने पोलीस चौकी उभारावी अशी मागणी क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती प्रा उत्तम केंदळे यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली आहे.

केंदळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई असताना वासुली फाटा येथे पोलीस चौकी व्हावी अशी मागणी केली होती. सध्या पोलीस स्टेशन होत असताना पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या चाकण टप्पा क्र.२ हा भाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने व्यापलेला आहे. या भागात मोठी औद्योगिक वसाहत तसेच अनेक कंपन्या मध्ये काम करणारे कामगार या भागात आपले जीवन जगत आहे.

खरे पाहता या भागाची व्याप्ती खूप मोठी आहे सहा गावे मिळून चाकण टप्पा क्र.२ उभारला आहे यातच म्हाळुंगे पोलिस चौकीची व्याप्ती खूप असल्याने या सर्व गावांच्या मध्यभागी वासुली फाटा या ठिकाणी बाजार पेठ भरते तेथे पोलिस चौकी उभारणे गरजेचे आहे
या भागातून जाताना शेतकरी,ग्रामस्थ, नागरिक,विद्यार्थी वर्ग ,महिला तसेच बाहेरून आलेला कामगार वर्ग यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येतो याचा फायदा घेत काही गुंड,लुटारू,चोर इ.चा स्थानिकांना त्रास देतात यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढ होत आहे. आणि यातूनच मोठे गुन्हे घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. म्हणून पोलीस चौकी उभारली तर निश्चितच या बाबींवर आळा बसेल

वासुली फाटा या ठिकाणी जर नव्याने पोलिस चौकी उभारण्यात आली. तर साहजिकच शिंदे,वासुली, वराळे, भांबोली,सावरदरी,खालुंब्रे,शेळू,आसखेड,करंजविहिरे,शिवे आणि पश्चिम भागातील सर्व गावांसाठी महत्वाचे ठिकाण आणि सध्याची सर्वात मोठी बाजारपेठ वासुली फाटा आहे त्यामुळे याभागातील आमचे शेतकरी, ग्रामस्थ व गावकरी बांधव यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना पोलीस चौकी जवळ उपलब्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा त्यांचे काम करण्यास सोयीस्कर होणार आहे पूर्वी चाकण येथे जावे लागायचे तर सध्या म्हाळुंगे येथे आमच्या भागातील ग्रामस्थांना जावे लागते त्यामुळे याभागाचा कायम चा प्रश्न सुटणार आहे असे देखील त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Share this: