आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

महापौर निधीतून शहरासाठी चार अम्ब्युलन्स व एक रक्तपेढी देण्यात येणार – महापौर माई ढोरे

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या महापौर विकास निधीतून चार अम्ब्युलन्स व एक रक्तपेढी (प्लाझ्मा पेढीसह) नागरिकांसाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. अनेक रुग्णांना वाहतुकीसाठी अम्ब्युलन्स देखील मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर आता महापौर निधीतून चार अम्ब्युलन्स खरेदी करण्यात येणार असून शहरातील कोरोना रूग्णांसाठी महापौरांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.यामुळे शहरातील कोरोना रूग्णाला वेळेवर अम्ब्युलन्स उपलब्ध उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, या चारमधील दोन अम्ब्युलन्समध्ये दोन कार्डियाक अम्ब्युलन्स असणार आहेत. तसेच, एक रक्तपेढी (प्लाझ्मा पेढीसह) सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली आहे .

Share this: