राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

पिंपरी (वास्तव संघर्ष) :राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने आज 12 जानेवारी रोजी हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शक्तीस्थान, ऊर्जास्थान, प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची जयंती लांडेवाडी भोसरी या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वर्षा जगताप, हीना अत्तार,नेहा पडवळ, शलाका बनकर, सारिका ढामे, राजश्री , रविराज काळे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे तसेच स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती सोनाली गव्हाणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सविता खुळे, निर्मला गायकवाड, सुनिता तापकीर, शारदा सोनवणे, सारिका सस्ते, अश्विनी जाधव, कमल घोलप, निर्मला कुटे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.

Share this: