क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

भोसरी (वास्तव संघर्ष): महावितरणच्या कनिष्ठ अभियंताला  50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात प्रमाणे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कल्लूवितील मथाई जॉनी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोषकुमार गिते, कनिष्ठ अभियंता, महावितरण, भोसरी उपविभाग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांची रिनी इंजिनियर्स नावाची कंपनी एमआयडीसी भोसरी मध्ये असून त्यांची तेथे एकूण 15 गुंठे जागा आहे) या कंपनीतील लाईट मीटर कनेक्शन तोडण्यासाठी आलेले आरोपी महावितरणचे कनिष्ठ अभियंता संतोषकुमार गिते यांनी फिर्यादीकडे पन्नास हजार रुपयाची लाच मागितली आहे.आरोपीने त्याच्या पदाच्या नात्याने आवश्यक काम पार पाडण्यासंबंधात कायदेशीर परिश्रमका खेरीज अन्य पारितोषण म्हणून भ्रष्ट बेकायदेशीर मार्गाने आपल्या पदाचा गैरवापर  करून लाच रक्कम स्वतःसाठी मागणी करून फायदा मिळविण्याच्या उद्देशाने पुन्हा एकदा स्वरूपाचे वर्तन केले म्हणून त्यांना अटक करण्यात आले आहे.अधिक तपास भोसरी पोलीस करित आहेत

Share this: