क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पोलीस भरतीसाठी उभे केलेल्या ‘डमी’ उमेदवारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली अटक

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी ‘डमी’ उमेदवार उभे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली आहे.

ज्ञानेश्वर सुखलाल चंदेल (वय-29 रा – मु.पो . लोधेवाडी , पो – खामगाव , ता – बदनापुर , जि – जालना ) कार्तिक ऊर्फ वाल्मिक सदाशिव जारवाल , (वय -23, रा – मु.पो एकबुर्जी वाघलगाव , ता – गंगापुर , जि औरंगाबाद)अरुण विक्रम पवार वय-26 रा . मुपो अंथरुण पिपंरी ता व जि – बीड ) अर्जुन विष्णु देवकाते (वय-28 वर्षे रा . मुपो कवडगाव ता वडवणी जि बीड ) अमोल संभाजी पारेकर (वय-22 रा . काळेची वाडी पो . भोगलवाडी ता धारुर जि बीड) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदाच्या 720 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर 2021 रोजी झाली. त्यातील पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी डिसेंबरमध्ये झाली. त्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांना निगडी पोलीस मुख्यालय पिंपरी चिंचवड येथे बोलविण्यात आले होते.त्यादरम्यान 4 जानेवारी रोजी उमेदवार जिवन काकरवाल याचे मुळ कागदपत्र पडताळणी करत असताना त्याचे फॉर्म वरील फोटो आणि स्वाक्षरी यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आले.

त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने मैदानी परिक्षा ही डमी परिक्षार्थी मार्फत दिली असल्याचे व लेखी परिक्षेसाठी इलेक्ट्रॉनीक स्पाय डिव्हाईस वापरून लेखी परिक्षा दिल्याचे कबुल केले. तसेच अधिक चौकशीमध्ये रविंद्र गुसिंगे व चरणसिंग काकरवाल यांनी देखील गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हँडसेट इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईसेस वॉकिटॉकी संच वॉकिटॉकी चार्जर रोख रक्कम 11 लाख रूपये याशिवाय 100 हुन जास्त ब्ल्यु – टुथ इयर बग्ज , मोबाईल फोन व स्पाय डिव्हाईसेस लपवुन नेण्यासाठी वापरलेले बनियान , टि – शर्टस् , अंडरवेअर , सपोर्टर , वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्डस् , कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत.नमुद गुन्ह्याचे तपासामध्ये औरंगाबाद , जालना व बीड या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या व परिक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या 6 टोळ्या उध्वस्त केल्या असुन बीड,औरंगाबाद,जालना, नागपुर ,अमरावती ,अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 20 हुन अधिक वेळा वेगवेगळ्या तपास पथकांनी आरोपी राहात असणाऱ्या दुर्गम परिसरामध्ये जावून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आरोपींना अटक केली आहे.

Share this: