वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळत ज्ञानेश ढोरे यांची आयुश्री कोविड सेंटरला मदतीचा हात
पिंपरी(वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ज्ञानेश जवाहर ढोरे याने स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळत आयुश्री कोविड सेंटर या संस्थेस ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे .
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो याच सामाजिक बांधिलकीतून ज्ञानेश याने हा निधी सुपूर्द केला आहे, ५१ हजार रुपयांचा निधीचा चेक आयुश्री कोविड सेंटर पिंपळे-गुरव येथे रुग्णांच्या सेवेकरिता अर्पण केला आहे . या वेळी महापौर उषा ढोरे, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस युवा मोर्चाचे जवाहर ढोरे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी निम्हण,वैशाली घाडगे,माऊली घोलप,संजय मराठे उपस्थित होते .