पिंपरी चिंचवड महापालिकेची फसवणूक केलेप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा : दिपक कांबळे
पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्पर्श हॉस्पिटलच्या संचालकासह महानगरपालिकेचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमताने कोटी बिले सादर करून 3 कोटी 28 लाख रुपये घेतले आहे. त्याकरिता त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे नेते दिपक कांबळे यांनी पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कांबळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की , पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भोसरी येथे रामस्मृति मंगल कार्यालय व हिरा लोन्स याठिकाणी कोविड केअर सेंटर चालविण्याचा ठेका मनपा मार्फत फोर्च्युन स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आलेला होता. सदर ठिकाणी एकही रुग्ण दाखल नसताना कोटी बिले सादर करून फोर्च्युन स्पर्श हॉस्पिटलने महापालिकेकडून 3 कोटी 28 लाख रुपये घेतले आहे.
सदर प्रकरणामध्ये महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त 2 अजित पवार यांचेकडे शासनमान्य कोणतेही अधिकार नसताना ते या पदावर अधिकृतपणे मनपाचा कारभार पाहत होते. त्यांनी या पदाचा गैरवापर केला. या प्रकरणाची सखोल चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत स्पर्श हॉस्पिटलला जुन्या कामाबद्दल एकही रुपया बिल अदा करु नये व जुन्या जादा लुटलेल्या वसूल पात्र रकमा चौकशी नंतर वसूल कराव्यात. स्पर्श हॉस्पिटलला काम देताना निविदेतील तरतूदीपैकी जेवढा स्टाफ, डॉक्टर्स होता तेवढा स्टाफ व डॉक्टर्स त्या ठिकाणी नव्हते. परंतु त्यांनी बिल पुर्ण संख्येने घेतलेले आहे. त्यामुळे जेवढा स्टाफ व डॉक्टर्स कामावर तेवढेच बिल देवून उर्वरीत प्रकरणी दंडात्मक कारवाई करावी. काम दिल्याच्या पहिल्या दिवसापासूनची जादा बिलांची वसूली करावी तसेच या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादित टाकाण्याची मागणी या निवेदनात केली आहे .