बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील पोलिसांना कोरोनाची लागण 

पिंपरी(वास्तव संघर्ष) :मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस दलात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलातील 14 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. शहर पोलीस दलातील 946 पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.15 मे 2020 रोजी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा 946 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 942 पोलिसांनी कोरोनावर मात केली. तर चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पहिल्या लाटेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोरोनाला दूर ठेवले, मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा शहर पोलीस दलात कहर झाला. 345 अधिकारी आणि 2930 कर्मचारी असे एकूण तीन हजार 375 एवढे पिंपरी चिंचवड पोलिसांचे मनुष्यबळ आहे. त्यातील तब्बल 28 टक्के पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला.

देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. शासन स्तरावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शहरातील सात अधिकारी व सात कर्मचारी अशा एकूण 14 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच अधिकारी आहेत. त्यात महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे

Share this: