क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आमदार आण्णा बनसोडे यांच्या मुलावर निगडी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल

निगडी (वास्तव संघर्ष) :पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस ठाण्यात देखील दुसरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनसोडे यांच्या मुलासहीत आठ ते दहा जणांवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

स्वाती सचिन कदम (वय-39. रा. सर्वे नं – 215, घर क्रमांक, 2859 रायगड काॅलनी गंगानगर फुरसुंगी पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सिध्दार्थ आण्णा बनसोडे , आमदार बनसोडे यांचे पिए व इतर आठ ( त्यांचे पुर्ण नाव पत्ते माहित नाहीत) त्याचे विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. 11) रोजी दुपारी साडेबारा वाजता एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे त्यांच्या पीए आणि इतर आठजण दोन कार आणि दुचाकीवरून आले . कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीने घुसून धनराज बोडसे , अमोल कुचेकर यांना हाताने मारहाण केली . त्यानंतर ऑफिसच्या समोरच्या बाजूला येऊन बेकायदेशीर जमाव जमवून कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत’ अशी विचारणा केली . तानाजी पवार यांच्याबाबत माहिती नसल्याचे ऑफिसमधील लोकांनी सांगितले असता ऑफिसमधील आयटी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी या घातक शस्त्राने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . तसेच कामगार गोकर्ण चव्हाण याला ढकलून देऊन जखमी केले . त्यानंतर एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड या कंपनीचे ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यासाठी सांगून तानाजी पवार यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली . अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.
.

Share this: