स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या दोन महिलांना वाकड पोलीसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील वाकडमधील कस्पटेवस्ती सॉलिटेअर बिझनेस हबमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.०१) हि कारवाई करण्यात आली आहे
स्पा सेंटर मालक जया राकेश यादव (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) व स्पा मॅनेजर खुशी सैनप्पा शिंदे (वय २३, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या कस्पटे वस्ती, वाकड येथील सॉलिटेअर बिझनेस हब मध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवत होत्या. सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.०१) याठिकाणी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. तसेच साडे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.