क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ पञकारांवर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये तोतया आणि बोगस पञकारांवर प्रशासनाचा कसलाही वचक नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा या क्षेत्रात जास्त प्रमाणात वावर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील एका पञकाराला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आता आणखी दोन पञकारांवर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.28) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे.

प्रमोद अवघडे यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार श्रीजीत, अँडम आणि त्याचे चार ते पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी प्रमोद यांचे शेंतनु नावाचे देहूरोड येथे हाॅटेल आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बेकायदेशीर ब्रेकिंग न्युज नावाचे चँनल चालविणारा श्रीजीत रमेशन व अँडम याचे चार ते पाच साथीदार हे फिर्यादी प्रमोद यांच्या हाॅटेलमध्ये येऊन सोबत आणलेली दारूची बाँटल टेबलावर ठेवली त्याला हाॅटेलच्या आचारीने दारू पिण्यासाठी मनाई केली असता त्यास दम देवून टेबलवर ठेवलेल्या दारूच्या बाटलीचा फोटो काढुन महिना तीन हजार रुपये हप्ता देण्यास सांगुन सदरचा हप्ता न दिल्यास सदर फोटो व्हायरल करतो अशी धमकी दिली.

यावर फिर्यादी प्रमोद यांनी आरोपींना हप्ता देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने हॉटेल मध्ये काढलेले फोटो ब्रेकिंग न्युज म्हणून चँनेलवर चालविले त्यामुळे फिर्यादीची समाजात असलेली प्रतिष्ठा मलीन झाली आहे.आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 383.384.385.378.34.120(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Share this: