क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी (वास्तव संघर्ष) : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना  मे 2021ते ऑगस्ट 2022 दरम्यान राधाकृष्ण कुंज बिल्डिंग, चौथा मजला, फ्लैट नं-10 गैलाड चौक, पिंपरी येथे घडली आहे.

याबाबत 15 वर्षाच्या पीडीत अल्पवयीन मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

त्यानुसार 16 वर्षाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत
फिर्यादीचा मित्र याने लग्नाचे अमिष दाखवून शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार असे म्हणून फिर्यादीनी  त्यास नकार देवून विरोध केला असतांना देखील आरोपीने  फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारिरिक संबंध करून फिर्यादीला 8 महिन्यांची गरोदर केली आहे. आरोपीवर पोलीसांनी भादंवि कलम 376, बाल लैंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियम कलम 3,4,7,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: