माझं पिंपरी -चिंचवड

शिवसेनेतील बहुजन चेहरा युवराज दाखले यांची स्वतंत्र आस्तित्व  निर्माण करण्याकडे वाटचाल

पिंपरी (वास्तव संघर्ष ):- खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या व शिवसैनिकांविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांनी खरपूस समाचार घेतला होता. राणे यांच्या विरोधात दाखले यांनी वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांनी दाखवलेले कार्य धाडसाचे असल्याचे सांगत शाबासकीची थाप उध्दव ठाकरे यांनी युवराज दाखले यांच्या पाठीवर दिली आहे. मुंबईत मातोश्री येथे दाखले यांच्यासह सर्व शिवसैनिकांची उध्दव ठाकरे यांनी भेट घेऊन पुढेही असेच धाडसी कार्य करत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना सचिव खासदार आनिल भाऊ देसाई यांनी युवराज दाखले यांचा पुष्पगुच्छ देऊन मातोश्रीवर सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, अमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, गोरख पाटी, बाळासाहेब गायकवाड, मारूती मस्के, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, मनोज शिंदे, आशिष वाळके, रविकिरण घटकार, सौरभ शेंडगे, नवनाथ जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले हे त्यांच्या समर्थकांसोबत आपले स्वतंत्र आस्तित्व  निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. दिवंगत माजी शिवसेना शहरप्रमुख नेताची चव्हाण, बाबासाहेब धुमाळ, तसेच भगवान आप्पा वाल्हेकर, बाजीराव लांडे व भारतीय विद्यार्थीं सेनेचे माजी शहरप्रमुख रामभाऊ उबाळे, माजी उपशहरप्रमुख दिलीप आंब्रे यांच्या नंतर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेमध्ये शिवसेना स्टाईल आक्रमक नेतृत्व युवराज दाखले यांच्या रूपाने उदयास येत आहे.

जातीपातीच्या जोरावर शिवसेना राजकारण करत आहे असा आरोप नेहमी विरोधक करत असतात माञ शिवसेनेत जात पाहून नेतृत्व स्वीकारले जात नाहीआणि म्हणूनच की काय शिवसेनेतील बहुजन चेहरा युवराज दाखले यांची स्वतंत्र आस्तित्व  निर्माण करण्याकडे वाटचाल चालू असलेली दिसते.

Share this: