बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गडकिल्ले भाड्याने देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध पिंपरीत आंदोलन

पिंपरी, (वास्तव संघर्ष ) – छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख सांगणा-या गड, किल्यांवर लग्न समारंभ आणि हॉटेल व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकार परवानगी देणार आहे. तशा हालचाली सुरू असून या निर्णयाच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमधील मनसे आणि सामाजिक संस्था संघटनांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज आंदोलन केले.

राज्यातील भाजप सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आणि संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे. राज्यातील 25 गड, किल्ले लग्न सोहळा आणि हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय भाजप सरकार घेत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभरातून तिव्र विरोध होत आहे. आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मनसे, सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Share this: