क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीमध्ये एकावर गोळ्या झाडून केला खून

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा गँगवाँरने डोके वर काढले आहे.यामुळे पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे.चिंचवडच्या रामनगर येथे एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करून हत्याराने वार करत खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी(दि.2) रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

विशाल उर्फ गिड्या गायकवाड ( वय 38 ) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास रामनगर येथे परशुराम चौकात विशाल उर्फ गिड्या या गुन्हेगाराचा काही अज्ञात आरोपींनी खून केला आहे. गोळीबार करून त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

Share this: