क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

इको गाडीमध्ये मटका जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना चाकण पोलिसांनी केली अटक

चाकण (वास्तव संघर्ष) :आळंदी फाटा येथे मारुती सुझुकी इको गाडीमध्ये शिक्रापूर मटका जुगार खेळणाऱ्या दोन आरोपींना चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

गोविंद हनुमंत उपाडे (वय-36 रा.मोशी ता . हवेली जि . पुणे ) अनिल स्वराज गोदाल (वय-31 रा . कुरूळी ता . खेड जि . पुणे)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फाटा येथे मारुती सुझुकी इको गाडीमध्ये काही इसम बसून मोबाईल फोनवरून तसेच छोटया पावती पुस्तकावर मटका जुगार घेत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली . इको कार ( एम एच 14 / एफ एम 9764 ) मध्ये मटका जुगार खेळणारे व खेळवणा – या इसमांकडून 10 हजार 300 रोख रक्कम , पावती पुस्तक , पेन , दोन मोबाईल फोन तसेच मारुती इको कार असा एकूण 3 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अनिल देवडे , सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे , कर्मचारी सुरेश हिंगे , संदिप सोनवणे , मच्छिंद्र भांबुरे , देवयानी सोनवणे , नितीन गुंजाळ , प्रेमकुमार पावडे , रेणुका माने यांनी केली.

Share this: