इंद्रायणी थडी कार्यक्रमाला आंबेडकरी पक्ष संघटनांकडून तीव्र विरोध
पिंपरी (वास्तव संघर्ष): शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी कार्यक्रमाप्रसंगी शनिवार दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी गावजत्रा मैदान भोसरी याठिकाणी भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणात मुख्य आरोप असणारे संभाजी भिडे उपस्थित राहणार असल्याचा आशयाचे फ्लेक्स शहरभरात लावण्यात आले आहेत. त्यावरूनआता वाद निर्माण झाला आहे.
भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वात पहिली फिर्याद ही पिंपरी चिंचवड शहरात नोंदविण्यात आली होती. त्यामधे संभाजी भिडेंवर आरोप करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी पक्ष, संघटनांसह जनतेतुन भिडेंच्या उपस्थित बद्दल संताप व्यक्त केला जात आहे, भिडे यांची वक्तव्ये नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. त्यांच्या उपस्थितीने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणूनच भिडेना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास बंदी घालावी अन्यथा लोकशाही मार्गाने भिडेंविरोधीत निदर्शने करण्यात येऊन निषेध केला जाईल असा इशारा लढा यूथ मूव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र भोंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चे युवक कार्याध्यक्ष यशवंत सुर्यवंशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विशाल कदम,आँल इंडिया पँथर सेनेचे शहराध्यक्ष अक्षय कसबे, लढा यूथ मूव्हमेंट चे बुद्धभूषण अहिरे, अतिश नागटिळक यांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.