बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वंचीतचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची वाढती क्रेझ ;विरोधी उमेदवारांलाही फोटो काढण्याचा आवरला नाही मोह

दिपक साबळे…! पिंपरी (वास्तव संघर्ष) एकीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची चढाओढ उमेदवारांत लागली आहे. पिंपरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रचाराची सुरूवात आज कासारवाडी ते दापोडी येथून झाली यावेळी दापोडीत भापसे पार्टीचे उमेदवार दीपक ताटे यांनी थेट वंचीतचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना हस्तांदोलन करत फोटो काढला एकंदरीतच वंचीतचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची मतदारसंघातील सामान्य जनतेत वाढती क्रेझ आहे.

तसेच विरोधी उमेदवारांलाही त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही मोह त्यानंतर , दोन्ही उमेदवार आपल्या प्रचाराला लागले आहेत. 

शुक्रवारी बाळासाहेब गायकवाड दापोडीमध्ये प्रचार करत होते त्यादरम्यान भापसे उमेदवार स्वताहून त्यांना भेटायला आले आणि फोटोही काढून घेतला .बाळासाहेब गायकवाड यांनीही मोठ्या मनाने ताटे यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो’ : प्रविण उर्फ बाळासाहेब गायकवाड

या भेटीमुळे सोशल मीडियात विविध चर्चांना उधाण आले . मात्र यावर प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, माझ्याकडे ते आले त्यांचं स्वागत मी केलं. आणि शुभेच्छाही दिल्या. ‘राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो, बाळासाहेब आंबेडकर यांची मला शिकवण आहे की, विरोधी पक्ष निवडणुकीत आमचे स्पर्धक आहेत शत्रू नाही. ‘राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त दिली.

Share this: