क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सोसायटीत कुत्रे पाळतात म्हणून महिलेचा विनयभंग

पिंपरी (वास्तव संघर्ष) : सोसायटीमध्ये कुत्रे पाळतात म्हणून एका महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे तसेच त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना सोमवार (दि.25) रात्री साडेआठच्या सुमारास एन्थीया सोसायटी नेहरुनगर रोड पिंपरी येथे घडली आहे.

याबाबत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुलकर्णी, वर्षा बांडे, अलोक मिश्रा, सुनिता जैन, मनिष जाधव, नितीन गुप्ता, तनेजा, शिवपुजन ( वॉचमन ), सागर किल्लेकर, शिवा, प्रशांत खडे व इतर रहिवाशी (सर्व रा . एन्थीया सोसायटी नेहरुनगर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला हे त्यांच्या पाळीव कुत्र्यास फिरविण्यासाठी घेवुन जात असताना आरोपी वॉचमन शिवपुजन याने त्याच्या हातातील लाकडी दांडके कुत्र्याच्या दिशेने फेकुन मारले या कारणावरुन तसेच फिर्यादी महिला राहत असलेल्या सोसायटीतील रहिवाशांनी फिर्यादी महिला या कुत्रे पाळत असल्याचा राग मनात धरुन जुन्या भांडणाच्या कारणावरुन सोसायटीच्या मिटींगसाठी बोलवुन फिर्यादी महिला व त्यांचे पती यांच्यावर धावुन जावुन त्यांना घेराव घालुन फिर्यादी महिला व त्यांचे पतीना शिवीगाळ करत बघुन घेण्याची धमकी दिली तसेच कोणीतरी अज्ञात रहिवाशाने फिर्यादी महिलेच्या पार्श्वभागावर हात लावला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: