क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सावधान..! इंन्स्टाग्रामवरील रिल्सवर पोलिसांची आहे करडी नजर

पिंपरी (वास्तव संघर्ष) :सध्या इंन्स्टाग्रामवर या सोशल मीडियावर भाऊ, भाई, दादा ‘क्वीन’ अशा लोकांची भाऊगर्दी  पाहायला मिळते. रिल्स बनवून काही भाई समोरच्या प्रतिस्पर्धीला आवाहन देत धमकी देतात. यामुळे समाजात भीती पसरविण्याचे काम देखील करत होते . अशाच पद्धतीने समाजात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवडमधील इन्स्टाग्रामवरील  भाईनी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करताना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक सुनील चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

अक्षय उर्फ पप्पू महादेव खोजे, ओंकार उर्फ भिकू प्रशांत ठाकूर, अक्षय देविदास चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हातात कोयता घेऊन चित्रपटातील डायलॉग म्हणत आरोपी इंन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत होते.तसेच अनिकेत जाधव आणि सोमनाथ पाटोळे या गुन्हेगारांना फॉलो करत असल्याचेही समोर आले आहे.या गुन्हेगारांपैकी, पाटोळे हा कारागृहात आहे तर जाधव यांचा काही वर्षांपूर्वी खून झाला होता. आरोपीकडून पोलिसांनी दोन कोयते आणि एक तलवार असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गुंडा विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर भाईगिरी  दहशत पसरवणारे व्हिडीओ अथवा इतर पोस्ट आढळल्यास पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांवर पोलिसांचे करडी नजर असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी सांगितले.

Share this: