चिखलीतील घरकुल येथे पिस्टूल आणि दोन काडतुसे वापरल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी केली अटक
चिखली (वास्तव संघर्ष) :चिखलीतील घरकुल पिरबाबा दर्ग्याजवळ संशयितरित्या पिस्टूल आणि दोन काडतुसे वापरल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे .ही घटना रविवारी दुपारी दिडच्या सुमारास घडली आहे.
ओंकार रवींद्र गुंजाळ ( वय 25 , रा.घरकुल , चिखली ) असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील घरकुल येथे पिरबाबा दर्ग्याजवळ आरोपी ओंकार हा संशयितरित्या थांबला असल्याची माहिती पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना मिळाली . त्यानुसार पोलिसांनी घरकुल येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले . त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे आढळून आली .
पोलिसांनी आरोपी ओंकारकडून पिस्टूल आणि काडतुसे जप्त केली आहे .आरोपी ओंकार याने मागील तीन महिन्यांपूर्वी हे पिस्टल आरोपी सलीम याच्याकडून खरेदी केले होते . सलीमवर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असून तो एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे . अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत .