चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात 2 हजार 152रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. एकिकडे सरकारने सकाळी सहा ते संध्याकाळी सहा अशी संचारबंदी केली असतानाही रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आज (सोमवारी) शहरात 2 हजार 152 नवीन नोंद झाली आहे .
पालिकेच्या ‘अ’क्षेत्रीय हद्दीत सर्वाधिक 386 आणि ‘ ब ‘ कार्यालय हद्दीत 356 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत . तसेच उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1815 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . शहरातील 14 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 16 जणांचा आज मृत्यू झाला आहे . त्यात 10 पुरुष आणि 6 महिला रुग्णांचा समावेश आहे . शहरात आजपर्यंत 1 लाख 53 हजार 80 जणांना कोरोनाची लागण झाली आहे .
त्यातील 1 लाख 28 हजार 450 जण बरे होऊन घरी गेले आहेत . शहरातील 2079 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 848 अशा 2927 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे .सध्या 3804 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत