क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीगावात तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करणा-या आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीगावातील बालमल चाळ नवमहाराष्ट्र शाळेच्या पाठीमागे एक महिन्यापासून तरुणीचा पाठलाग करून करत तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा प्रकार पिंपरी येथे घडला असून याबाबत रविवारी ( दि .4 ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत 29 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

अल्ताफ शेख ( वय 35 , रा . पिंपरी ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मागील एक महिन्यापासून आरोपी अल्ताफ हा फिर्यादी तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करत होता . तरुणीकडे पाहून शिवीगाळ व धमकी देत होता . रविवारी सायंकाळी त्याने फिर्यादी तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तरुणीचा विनयभंग केला. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत .

Share this: