तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) : गाडीची चावी मागण्याच्या कारणावरुन एका तरुणाच्या डोक्यात कोयता मारून आरोपी फरार झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.11) रोजी रात्री अकराच्या सुमारास डॉ.आंबेडकर चौक पिंपरी येथे घडली आहे.

मनोज करण सिंग (वय-22 रा. शंकर मंदिराजवळ , शंकरवाडी नाशिक फाट्याजवळ भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यश देशमुख ऊर्फ गटया ( वय-17 सर्व रा. भाटनगर पिंपरी), अज्ञात असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत तसेच दोन अल्पवयीन आरोपी असल्याने समजपत्र देवुन पोलिसांनी त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज हे भोसरीला जाण्यासाठी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे थांबले असताना फिर्यादी मनोज यांचे ओळखीचे तीन व्यक्ती व एक अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादी मनोज करणसिंग यांना गाडीची चावी मागण्याच्या कारणावरुन शिवीगाळ तसेच हाताने मारहाण केली नंतर लोखंडी कोयत्याने फिर्यादी मनोज यांच्या डावे हाताच्या पोटरीवर व डोक्यात जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करुन जखमी करुन फरार झाले. अधिक तपास पिंपरी पोलीस करित आहे.

Share this: