बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महामेट्रोच्या कामगारांचे उर्वरित थकीत वेतनाची दमडीही न मिळाल्याने मोर्चा – मारुती भापकर

 

पिंपरी :- महामेट्रोने कामाचा ठेका दिलेल्या मे. एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या संस्थेने कामगांरांचे मासिक पगार देण्याचे केवळ आश्वासन दिले. थकीत सर्व वेतन ३० जूनलाच दिले जाईल असे पुन्हा एकदा आश्वासन दिले. मात्र ३० जुनपासून आजपर्यंत कामगारांचे उर्वरित थकीत वेतनाची दमडीही मिळालेली नाही. शब्द पाळला नाही. याच्या निषेधार्थ कामगार मंगळवार (दि.०९) रोजी फुगेवाडी येथील महामेट्रो रेल पुणे कार्यालयात आंदोलन करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महामेट्रो रेल पुणेचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित
यांना पत्र पाठविले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टच्या कामगारांनी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली महामेट्रोचे आपली भेट घेऊन डिंसेबर २०१८ पासून संबंधित कंपनीने कामगारांचे वेतन थकवले असून याबाबत आम्ही १ मे २०१९ पासून आंदोलन करीत आहोत. मात्र संबंधित या कंपनीने वारंवार शब्द फीरविल्यामुळे १ जून २०१९ आम्ही पुन्हा आंदोलन केले. महामेट्रो रेल प्रकल्पाच्या फुगेवाडी येथील आपल्या कार्यालयात घुसून आपल्या उपस्थितीत ६ जून ला आंदोलन केले. त्यावेळी आपण संबंधित कंपनीला २० जून पर्यंत कंपनीला कामगारांची यादी महामेट्रोला देण्यात यावी. ३० जून पर्यंत सर्व कामगारांचे थकीत सर्व वेतन अदा करावे. जर नाही केले तर संबंधित कंपनीच्या बँकगँरटीमधून अदा केले जाईल. असे त्यावेळी आपण कंपनी व्यवस्थापकाला सांगितले.

दरम्यानच्या काळात एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बिराजदार यांनी काही कामगारांचे थकीत वेतन २० जून रोजी अदा केले. मात्र ३० जून पर्यंत उर्वरीत सर्व थकीत वेतन कंपनी अदा करु शकणार नाही. अशी भूमिका कंपनीने घेतली. त्यावर आपण गुरुवार दि.२७/०६/२०१९ रोजी फुगेवाडी येथील महामेट्रोच्या कार्यालयात आपण आलेले आहात. ही बातमी आम्हाला कळाल्यामुळे सामाजिक कार्येकते मारुती भापकर व अभिजीत भास्करे, विनोद भालेराव, प्रभाकर माने, सुजित चव्हाण, केदार घाटपांडे, कृष्ण कुमार, अरुण गायकवाड, तुकाराम जोगी, पवन बिराजदार थेट फुगेवाडी कार्यालयात आलो. त्यावेळी एचसीसी अफ्रा इन्फ्रा प्रोजेक्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल बिराजदार यांनी काही कामगारांचे थकीत वेतन २० जून रोजी अदा केले. मात्र ३० जून पर्यंत उर्वरीत सर्व थकीत वेतन कंपनी अदा करु शकणार नाही. अशीभूमिकाकंपनीने घेतली.

हे कामगार वेगवेगळ्या राज्यातील असल्यामुळे त्यांना वारंवार हेलपाटे मारणे शक्य नाही. त्यामुळे आपण सर्व कामगारांचे थकीत वेतन ३० जुलै ला अदा करावेत असे लेखी पत्र आम्ही आपल्याला दिले. मात्र दि.२७/०६/२०१९ आपण कामगारांचे थकीत सर्व वेतन ३० जूनलाच दिले जाईल असे पुन्हा एकदा आश्वासन दिले. मात्र ३० जुनपासून आजपर्यंत कामगारांचे उरर्वरित थकीत वेतनाची दमडीही मिळालेली नाही. आपण आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे आम्हाला नाईलास्तव मंगळवार दि.०९/०७/२०१९ रोजी फुगेवाडी येथील महामेट्रो रेल पुणे कार्यालयात आंदोलन करावे लागत आहे. आम्ही हे आंदोलन मंगळवार दि.०९/०७/२०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता करणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या कार्यालयाची असेल, असे भापकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

या निवेदनाची प्रत त्यांनी प्रशांत कुलकर्णी, महामेट्रो रेल फुगेवाडी कार्यालय, अनिल बिराजदार, मे.एच.सी.सी. अल्फ्रा इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी यांनाही पाठविली आहे

Share this: