आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बंधूच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला ;घटनास्थळावरून हल्लेखोर पसार
पिंपरी(वास्तव संघर्ष) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे . ही घटना मंगळवारी ( दि . 23 ) दुपारी पिंपळे
पिंपरी(वास्तव संघर्ष) : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे . ही घटना मंगळवारी ( दि . 23 ) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली .
मिळालेल्या माहितीनुसार , चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत . पिंपळे सौदागर येथे त्यांचे कार्यालय आहे . मंगळवारी दुपारी एका दुचाकीवरून तिघेजण आले . त्यांनी आपल्यावळील दोन पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या दिशेने फेकले. त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले. त्यापैकी एक पेट्रोल बॉम्ब कार्यालयाच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक डीपीजवळ पडला . सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही .
एका काचेच्या बाटलीमध्ये काही प्रमाणात पेट्रोल टाकले जाते . दिव्याप्रमाणे त्याची वात बाहेर काढली जाते . ज्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकायचा असतो तिथे ती वात पेटवून बाटली फेकली जाते . बाटली फुटल्यावर स्फोट होतो . याला पेट्रोल बॉम्ब असे म्हणतात . माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.