क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक : बायकोचा खून करून पती झाला पिंपरी पोलीस ठाण्यात हजर

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे.बायकोचा खून करून पती  पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून वाद होत होता. त्यातून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील पाटा घालून ठार केले. हा प्रकार आज मंगळवारी (दि.23) सकाळी पिंपरीतील नेहरूनगर येथे घडला.

जेनल अजमुद्दीन चाकोरे (वय-35 , रा.रसरंग चौक, नेहरूनगर, पिंपरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

अजमुद्दीन अल्लाउद्दीन चाकोरे (वय-38 रा . रसरंग चौक , नेहरूनगर, पिंपरी ) असे आरोपी पतीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत जेनल आणि आरोपी अजमुद्दीन हे पती – पत्नी आहेत . मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वाद होत होता . त्यातूनच आरोपी अजमुद्दीन याने जेनल यांच्या डोक्यात घरातील पाटा घालून त्यांचा खून केला . पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी अजमुद्दीन पिंपरी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे . त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे . अधिक तपास पिंपरी पोलीस  करीत आहेत .

Share this: