बातम्या

फुले सृष्टी व शाहू सृष्टीचे भुमिपूजन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  के.एस.बी. चौक, शाहूनगर येथे राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहू सृष्टीमधील विकसित करण्यात येणा-या कामाचा शुभारंभ तसेच पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले पुतळा परिसरात फुले सृष्टी तयार करण्याच्या कामाचा भुमिपूजन समारंभ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.

 या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अँड नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्य केशव घोळवे, संतोष लोंढे, तुषार हिंगे, नगरसदस्या शर्मिला बाबर, माजी नगरसदस्य मारुती भापकर, स्विकृत सदस्य सुनिल कदम आदींसह सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Share this: