क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘ पंगा नाही घ्यायचा , नाहीतर विकेट’ तडीपार आरोपीने दिली पिंपरी पोलीसांना धमकी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : तडीपार झालेल्या आरोपीने पिंपरी चिंचवडमधील पोलिसांना कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास पवनेश्वर ब्रिजच्या पाठीमागे पिंपरीगाव याठिकाणी घडली आहे . पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .

पोलीस नाईक शहाजी धायगुडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार ( वय 28 , रा .बिल्डींग नंबर व्ही रुम नंबर-6  मिलिंदनगर , पिंपरी ) आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी अतुल उर्फ चांड्या याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे .  तडीपारी संपण्यापूर्वी तो पिंपरी चिंचवडमधील पवनेश्वर ब्रीजच्या मागे आला होता. याबाबत माहिती  पोलिसांना मिळताच फिर्यादी पोलीस नाईक शहाजी धायगुडे आणि त्यांचे सहकारी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले .

आरोपी अतुल उर्फ चांड्या याने कोयता जवळ बाळगून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत झटापटी केली . त्यानंतर कोयता हातात घेऊन ‘ आज पंगा नाही घ्यायचा , नाहीतर विकेट ‘ असे म्हणून पोलिसांच्या अंगावर धावून गेला . पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘ आज दिवस तुमचा आहे . उद्या काय करणार . तुम्हाला मीच पुरा पडणार ‘ असे म्हणून शिवीगाळ करून पोलिसांना धमकी दिली . अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: