क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दलित समाजातील तरुणीवर लैंगिक अत्याचार ;पिंपरी चिंचवड पोलीसांनी आरोपीला केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :लग्नाचे आमिष दाखवून पिंपरी चिंचवडमधील एका दलित तरुणीवर अत्याचार करुन गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  जून ते ऑक्टोबर 2021 दरम्यान अलंकापुरम सोसायटी  खडी मशीन जवळील साईदिप लॉज याठिकाणी ही घटना घडली आहे. आरोपीवर दिघी पोलीस ठाण्यात अॅस्टोसिटी  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत दलित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

साहिल काळुराम पवार (वय-20, रा शेलपिंपळगाव ता. खेड जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी ही हिंदू चांभार या दलित समाजातील आहे असे आरोपी साहील याला माहीत होते. आरोपी साहील याने फिर्यादी तरूणीशी मैत्री करुन तिचा विश्वास संपादन करत तीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपी साहील याने पिडीत फिर्यादी तरुणीला साईदिप लॉज याठिकाणी नेऊन
तीच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार  शारिरिक संबंध ठेवुन गर्भवती केले तसेच लग्न करण्यासाठी तिला पळवून नेले . मात्र पिडीत फिर्यादी तरुणी हिंदु चांभार या समाजाची असल्यामुळे तिच्यासोबत लग्न करण्यास आरोपी साहील याने नकार दिला . आरोपी साहील विरोधात अनुसुचित जाति जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲस्टोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रेरणा कट्टे करित आहेत.

Share this: