क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील भाटनगर येथे रिक्षाचालकावर धारधार हत्याराने वार ;दोन आरोपीवर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील भाटनगर येथे पॅसेंजरचा बहाना करुन रिक्षाचालकावर धारधार हत्याराने वार करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार (दि. 5)रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भाटनगर ते सर्वधर्मीय स्मशानभूमी रोडवर घडली आहे.

सचिन हनुमंत गायकवाड (वय-38 रा. चाफेकर चौक वेताळनगर झोपडपट्टी चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष सुभाष शिंदे( वय-20 रा . गांधीनगर पिंपरी),  निलेश निकाळजे (रा .पत्राशेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार  रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भाटनगर ते सर्वधर्मीय स्मशानभूमी रोडवर आरोपी संतोष आणि निलेश यांनी संगणमत करुन फिर्यादी सचिन यांच्या रिक्षामध्ये पॅसेंजर चा बहाना करुन बसले व चालु रिक्षामध्ये आरोपी संतोष आणि निलेश यांनी कशाच्या तरी धारदार वस्तुने फिर्यादी सचिन यांच्या पाठीवर व दंडावर मारुन जखमी केले .आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुभांर करित आहेत.

Share this: