महाराष्ट्रात पुन्हा जिल्हाबंदी ; पोलिसांनी अडविल्यानंतर त्यांना ई- पास कसा दाखवायचा .. सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र (वास्तव संघर्ष) :महाराष्ट्रात राज्य शासनाने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी जिल्हाबंदी देखील केली आहे. मात्र, ज्यांना या जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी जायचे असेल त्यांना शासनाने गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील पुन्हा ई पासची सुविधा उपलब्ध केली आहे. लक्षात घ्या अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणिबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.हा ईपास कसा मिळवायचा याबाबत आपण सविस्तर माहिती देत आहोत..
तुम्ही या जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जावू इच्छित असाल आणि तुम्हाला ईपास हवा असेल तर तुम्हाला प्रथम https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल,त्यानंतर ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करा..
त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा
योग्य ती आवश्यक कागदपत्र याठिकाणी अपलोड करा..
प्रवास का करायचा आहे याचे अत्यावश्यक कारण नमूद करा.
कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.
अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.
या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो. अधिक माहितीसाठी जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा