निगडीतील ओटास्कीम राडा प्रकरण : सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ आरोपींना अटक
निगडी (वास्तव संघर्ष) : निगडीतील ओटास्कीम येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून टोळक्याने तुफान राडा करत एकाला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता . ही घटना मंगळवारी (दि.20) रोजी दुपारच्या दीडच्या सुमारास तथागत हौसींग सोसायटी बिल्डींग नंबर एकच्या पार्किंगमधे घडली.या टोळक्यातील दहा ते अकरा आरोपींना आज (दि.23)रोजी निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
अविनाश राहुल धोंगडे( वय -२३ वर्ष रा.पीसीएमसी . कॉलनी वि.नं. रुम नं .१४ ओटास्किम निगडी ), निखिल रामदास साळवे (वय -२५ वर्ष रा . पठाण हो.सोसा . कब्रिज स्कुलमागे , रुपीनगर ) संतोष गणेश वाल्मिकी( वय २० वर्ष रा . पीसीएमसी . कॉलनी बि.नं .१ रूम नं .२८ ओटास्किम निगडी ) प्रसाद नंदकुमार बहुले( वय -२५ वर्ष रा.अण्णाभाऊ साठे वसाहत रुम नं .२२७ सम्राट अशोक बुद्धविहार जवळ निगडी ) दुर्वेश दत्ता भिंगारे (वय १ ९ वर्ष रा . पीसीएमसी . कॉलनी नि.नं .२ रुम नं .५१ ओटास्किम निगडी ) साहिल गुलाब शेख योगेश ऊर्फ किडक्या राजभोग, गुढग्या सन्या, दिपक विजय घडसिंग, प्रविण लक्ष्मण कोंढाळकर.. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दि .२० / ०४ / २०२१ रोजी दुपारी दिडच्या सुमारास शक्तीमान प्रकाश कांबळे हा मित्रांसोबत गप्पा मारीत उभा असताना एक रिक्षा व दोन मोटारसायकलवरुन आरोपींनी शक्तिमान कांबळे व रुपेश खबळे यांना काठ्या लाठयांनी मारहाण केली त्यावेळी रुपेश खवळे पळुन गेला . शक्तिमान कांबळे हा सदर ठिकाणाहुन पळुन जात असताना तथागत हौ.सोसा.समोर पडल्याने त्यास वरील नमुद आरोपींनी हातातील लाठ्या काठ्यांनी मारहाण करुन आरोपी गुढग्या ऊर्फ सन्या याने सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत निगडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला . वरील गुन्हाच्या संदर्भाने .पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे सदरची गुन्ह्यातील आरोपी निष्पन करण्यासाठी व आरोपी अटकेसाठी वेगवेगळ्या 5 टीम तयार करण्यात आल्या होत्या . त्याप्रमाणे निगडी पोलीसांनी 10 ते 11 आरोपींना अटक करुन पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे .
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , मा.पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर , मा.पोलीस उप – आयुक्त गुन्हे शाखा सुधीर हिरेमठ , सहा . पोलीस आयुक्त सागर कवडे यांचे मार्गदर्शखाली निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत . सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक निगडी पोलीस ठाणे गणेश जवादवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव खराडे , सपोनि.अन्सार शेख , सपोनि.लक्ष्मण सोनवणे , सपोनि.विजयकुमार धुमाळ , पोउनि , बांबळे , पोउनि महेंद्र आहेर , पोलीस अंमलदार सतीष बोले , किशोर पंढेर , रमेश मावसकर , शंकर बांगर , विलास केकान , राहूल मिसाळ , भुपेद्र चौधरी , विजय बोडके , विनोद व्होनमाने , इरफान मोमीन , रोहित मोरे , विजय उगले , सुनिल जाधव , निलेश चासकर , संदिप दानवे यांनी केली आहे .