क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

देहूरोड येथील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानी याची येरवडा कारागृहात रवानगी

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरातील देहूरोड हद्दीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानी याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात रविवारी ( दि .20 ) स्थानबद्ध करण्यात आले आहे . पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत .

जोएल भास्कर पलानी ( वय 21 , रा . ब्रिगल जीम समोर , साईनगर , मामुर्डी , देहुरोड ) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गुन्हेगारांच्या रेकॉर्डनुसार त्यांच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे . त्यातच देहूरोड परिसरातील कुप्रसिद्ध गुन्हेगार पलानी याच्यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . पलानी याच्यावर लोखंडी रॉड , कोयता , गावठी पिस्तोल यासारखी जीवघेणी हत्यारांसह दरोडा घालणे , दंगा करून गंभीर दुखापत करणे , जाळपोळ तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान करणे , तडीपार आदेशाचा भंग करणे . गंभीर दुखापत करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणे व अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे यांसारखे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत .

Share this: