महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई (वास्तव संघर्ष) :मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या.

सातारा येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचारही सुरु होते पण, अखेर आज कोरोनाशी त्यांचा लढा अपयशी ठरला. सातारा येथील फलटण तालुक्यात ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना १६ सप्टेंबर रोजी साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Share this: