पिंपरी चिंचवड पालिकेत पाणी पुरवठा विभागाची निवीदा देणा-या ‘त्या’ ठेकेदारांवर गुन्हा दाखल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड़ महापालिकेत पाणी पुरवठा विभागाची निवीदा मिळविण्याकरीता बनावट अनुभवाचा दाखला दिल्याप्रकरणी एका ठेकेदारांवर पालिकेच्या वतीने पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विठ्ठल लडकत (वय -57 वर्षे , रा.प्लॉट नं .19, सेक्टर नं .30/ 31, वाल्हेकरवाडी , चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मे . संजीव प्रिसीजनचे प्रो. संजीव यशवंत चिटणीस (वय-65 वर्षे , रा .65/6 , मेहता कॉर्नर , महेश सोसा बिबवेवाडी पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीव चिटणीस याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची निवीदा मिळविण्याकरीता पुणे महानगरपालिकेकडील पाणी पुरवठा विभागाकडील पर्वती जल शुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन गॅस सिलेंडर साठीवणुकी साठी शेड बांधणे , दहा किलो / तास क्षमतेचे क्लोरीनेटर्स पुरविणे , क्लोरीन न्युट्रलायझेशन यंत्रणा बसविणे व अशा प्रकारची कामे केल्या असल्याचा कार्यकारी अभियंता ( विद्युत ) कार्यालयाकडील बनावट अनुभवाचा दाखला तयार करुन पिंपरी चिंचवड महानगर पालिकेस सादर केला व महानगरपालिकेची फसवणूक केली. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.