बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

“सावरकर” चित्रपटाविरोधात पिंपरी चिंचवडमधील आंबेडकरी पक्ष संघटना आक्रमक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : विनायक दामोदर सावरकर यांच्या जिवनावर आधारित अभिनेता रणदिप हुड्डा याच्या प्रमुख भूमिकेतील “सावरकर” हा चित्रपट येत्या २२ मार्च पासून प्रदर्शित केला जाणार आहे. दरम्यान चित्रपटावर आक्षेप घेत आज पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणी तीव्र विरोध प्रदर्शन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील एकाही सिनेमागृहात शो होऊ देणार नसून चित्रपट बंद पाडु असा इशारा शहरातील तमाम आंबेडकरी पक्ष संघटनांनी दिला आहे.पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांशी केलेल्या पत्रव्यवहार सावरकर चित्रपटांतील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिरेखेत बदल व्हावा अथवा सीन कट करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

“सावरकर” या चित्रपटात महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिनयासाठी निवडलेल्या कलाकारावरून फक्त सोशल मीडियातुनच नव्हे तर देशभरातील लोकशाही तथा संविधान मानणार्‍या मोठ्या वर्गाकडून निषेध व्यक्त केला जात आहे.चित्रपटात बाबासाहेबांचा चेहरा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे फोटो उपलब्ध असून ते इंग्रजांच्याही राहणीमानाला लाजवेल असा त्यांचा पेहराव होता.चेहर्‍यावर प्रखर तेज होते. मात्र चित्रपटात ऐतिहासिक पात्र निवडताना काहीतरी साधर्म्य असायला हवे की नको? एकाला हिरो दाखवण्यासाठी महामानवाचे विकृतीकरण करण्याचा डाव सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व त्यांच्या संपूर्ण टीम ने आखला आहे असे यातून जाहीर होत आहे.लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजप व आर एस एस सावरकरांना प्रोजेक्ट करत आहेत.चित्रपटात सावरकरांचे खरे जिवनचरित्र दाखवले की नाही माहिती नाही मात्र भाजपाचा प्रचार करणारा हा भाजपाचा प्रचारपट आहे असे मानले जात आहे.

तात्काळ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी.बाबासाहेबांच्या भूमिकेतील केलेले संपुर्ण चित्रिकरण कट करुन दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्यासह संबंधित संपूर्ण टीम वर भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

Share this: