बातम्या

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेला जिल्ह्यातून तडीपार करा – भीम आर्मी


वास्तव संघर्ष
पिंपरी – भीमा कोरेगाव हिंसा दंगल प्रकरणी १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिकावर बेसावधपणे भ्याड हल्ला करण्यात आला होता, यावेळी अमानुषपणे आंबेडकरी समाजातील लहान मुले, महिला ,वृद्ध यांना मारहाण केली व त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. याचे पड साद देशभर पडले झालेल्या घटनेचा निषेध करत यामागील सूञधार मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना शिक्षा करण्याची मागणी होत आहे.


दरम्यान जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील १जानेवारी २०१९ ला देश आणि राज्यातील आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणार आहेत. गतवर्षीची घटना लक्षात घेता २५ डिसेंबर २०१८ ते ५जानेवारी २०१९ पर्यंत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.

पुण्यात ३० डिसेंबर २०१८ ला दुपारी तीन वाजता भीमा कोरेगाव संघर्ष महासभेला भीम आर्मी संघटनेचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा होणार असून या सभेला परवानगी देण्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र मागील वर्षभरात भिडेंना पोलीस आणि प्रशासन राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा सभा घेण्यास परवानगी देत आहे, असा दुजाभाव होता कामा नये. आम्ही कोणत्याही परिस्थितीत चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा घेणार असून त्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास न्यायालयात दाद देखील मागितली जाईल अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Share this: