बातम्या

आत्मदहन करणा-या तौसिफ शेख यांचा ससून रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू

कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता

कर्जत (वास्तव संघर्ष) येथील दावल मलिक ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या मागणीसाठी तरुणानं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच स्वतःला पेटवून घेतलं होतं . तौसिफ हासिम शेख (वय- ३५, राहणार – कर्जत) असं त्याचं नाव आहे. कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी काल (गुरुवारी ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून स्वत:ला पेटवून घेत आत्मदहन करणा-या तौसिफ शेख या तरूणांचा अखेर उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला.

कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Share this: