प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याची 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
पिंपरी (वास्तव संघर्ष) :केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , व बो – हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे . तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही 2 ऑक्टोबर 2020 रोजी संपुष्टात येणार होती. माञ ही मुदत 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषा ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्यायोग्य अशा घरांची निर्मिती केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांकडून अर्ज भरले जात आहे. या योजनेसाठी अर्ज स्वीकृतीकरिता २ ऑक्टोबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु, यासाठी पाच हजार रुपयांचा डीडी आवश्यक असल्याने बँकांच्या सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे डीडी वेळेत मिळणे अवघड होतं आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी, तक्रारी वाढल्याने नागरिकांच्या व विविध संघटनांच्या मागणीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अर्ज स्वीकृतीची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांनी दिली .