बातम्या

गौप्यस्पोट:आमदार गौतम चाबुकस्वारांनी लिपीकासह मिळून केली पिं-चिं मनपाची फसवणूक?

आमदार गौतम चाबुकस्वार नगरसेविका निकिता कदम यांनी झो. नि. पू. लिपीकासह मिळून केला लाखोचा गैरव्यवहार केल्याचा आरोप सुरेश निकाळजे यांचा आरोप


वास्तव संघर्ष
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसनमध्ये स्थानिक आमदार आणि नगरसेवकाचा हात आहे असा गोप्यस्पोट पिंपरी-चिंचवड आर, पी, आय युवक शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केला आहे. पिंपरीतील मिलिंदनगर पुर्नवसन प्रकल्प टप्पा क्रमांक दोनमध्ये दोषी लाभार्थी नगरसेवक निकिता कदम पिंपरी चे आमदार गौतम चाबुकस्वार आणी झोनिपु चे लिपीक राजू कांबळे यांनी आर्थिक देवाणघेवाण व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जबाबदार धरून कार्यवाई करावी अशी मागणी सुरेश निकाळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

याबाबत निकाळजे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे यात ते म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २१ पिंपरी मधील मिलिंद नगर पुनर्वसन प्रकल्प टप्पा क्रमांक २ गेली अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असताना व सदर प्रकल्पातील घोटाळ्यामुळे यापूर्वी सहाय्यक आयुक्त झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाच्या अधिकारी योगेश कडूसकर यांना विविध प्रश्नांना सामोरे जात नागरिकांचा रोष पत्कारुन बदलीला सामोरे जावे लागले होते. यामध्ये दोषी लोकांनी बोगस रेशनकार्ड, बोगस फोटो पास, बोगस निवडणूक ओळखपत्र, बोगस सर्वे करत प्रत्येकी बोगस लाभार्थी कडून २ते३ असा रोख रक्कम घेत व्यवहार केला आहे.

दरम्यान हाच तो प्रकल्प झोनिपु विभागातील त्या लिपिका विरोधात ही असंख्य तक्रारी आल्या होत्या. लिपिक राजू कांबळे यांनी शासकीय कामातील पदाचा गैरवापर करत बोगस फोटोपास व दस्तऐवज खोट्या नोंदी करत बोगस लाभार्थी तयार करण्यात मोठा सहभाग समजला जातोय. आमदार गौतम चाबुकस्वार आणि नगरसेवक निकिता कदम यांची या प्रत्यक्ष फूस आहे असेही निकाळजे पञात म्हणतात.

झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागातील भ्रष्ट कारभारामुळे ख-या लाभार्थीना हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत आहे सदर बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून ती कायदेशीर कारवाईस पाञ आहे. आर्थिक देवाण घेवाण करत पैशाची मोठी सेटिंग करण्यात आली आहे.सदर प्रकरणी आमदार, नगरसेवक, लिपीक यांच्यावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आणि जनतेची दिशाभूल करत आर्थिक फसवणूकप्रकरणी कायदेशीर फौजदारी कार्यवाईची मागणी देखील या पञात केली आहे.

Share this: