क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील खराळवाडीत अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील खराळवाडी कामगारनगर येथील
में . महालक्ष्मी सुपर मार्केट शॉप नं ८ मधुलिका सहाकारी गृहरचना येथे अवैधरित्या गुटख्याचा साठा करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तिवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कारवाई केली आहे.यावेळी त्याच्याकडून १८७० रु .किंमतीचा विमल पानमसाला व तंबाखु पाऊच असा माल जप्त करण्यात आला.

विशाल मालाराम देवासी( वय २४ वर्षे रा . फ्लॅट नं ०५ मधुलिका सहाकारी गृहरचना संस्था मर्यादित खराळवाडी कामगारनगर पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आणि अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

श्री.रा.काकडे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीच वाचताच्या सुमारास आरोपी विशाल देवासी याने तो रहात असलेल्या
फ्लॅट नं ०५ मधुलिका सहाकारी गृहरचना संस्था मर्यादित खराळवाडी पिंपरी येथे अवैधरित्या विमल पानमसाला व तंबाखु पाऊच असा माल प्रतिबंधीत केलेला असताना देखील साठवून विक्री करत होता. आरोपी याने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थाचे माहिती असतानाही १८७० रुपये किंमतीचा विमल पानमसाला व तंबाखु पाऊच असा माल प्रतिबंधीत केलेले तुबाखु जन्य पदार्थ विक्रीस ठेवला असताना मिळुन आला. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: