बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदावर धोरे,सोनवणे आणि चौंधे यांच्या नावाची चर्चा

पिंपरी (वास्तव संघर्ष) राज्यातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर झाली. पिंपरी-चिंचवड भाजपमधील इच्छुकांच्या आकांक्षांना पुन्हा धुमारे फुटले असून, पुन्हा गटातटांच्या राजकारणाला वेग आला आहे.माञ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदावर या नगरसेविका माई धोरे, नगरसेविका आरती चोंधे,आणि नगरसेविका शारदा सोनवणे या तीनपैकी एका महिलांची वर्णी लागणार अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. गेल्या वेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटाकडून नितीन काळजे राहुल जाधव यांना संधी देण्यात आली होती माञ आता चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटातील नगरसेवकांना ही संधी असल्याने वरील तीनपैकी एका महीलेला संधी मिळेल हे नक्की मानले जाते. माई धोरे या जेष्ठ नगरसेविका आहेत शारदा सोनवणे यांचे सासरे अशोकभाई सोनवणे हे भाजपचे गेले तीस वर्षांपासून एकनिष्ठ आहेत तर आरती चोंधेया दुस-यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक आज (गुरुवारी) बोलविली आहे. यामध्ये महापाैर पदासाठी इच्छुकांच्या नावे स्विकारुन त्या नावाची शिफारस वरिष्ठ पातळीवर होणार आहे. नगरसेवकांचा कल पाहून एकदंरित निर्णय होणार आहे.

दरम्यान,पिंपरी चिंचवडचे महापाैर पद हे महिला खुला प्रवर्ग या गटासाठी राखीव आहे त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापाैर पदासाठी चिंचवडमधून नगरसेविका माई धोरे, नगरसेविका आरती चोंधे,आणि नगरसेविका शारदा सोनवणे या तीनपैकी कोणत्या महिला नगरसेविकेला महापौर होण्याची संधी मिळणार, याबाबत चित्र शनिवारी स्पष्ट होणार आहे

Share this: