बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात शिक्षणाच्या उद्देशाने रुम भाड्याने घेणा-या विद्यार्थ्यांचे भाडे माफ करा;आपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष) शिक्षणाच्या उद्देशाने रूम भाडे तत्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे रूम भाडे शासनाने माफ करावे व भाडेकरारातून कोरोनाकाळातील महिने वगळावे यासाठी आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन केले आहे. आम आदमी युवा महाराष्ट्र संयोजक रणधीर नायडू यांनी निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्यात विशेषतः ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या उद्देशाने शहरी अथवा इतर भागात रूम घेऊन भाडेतत्वावर राहत आहेत. परंतु कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण शैक्षणिक संस्था तथा शैक्षणिक कार्यक्रम बंद आहेत.

परिणामी बहुतांश विद्यार्थी हे आपापल्या गावी परतलेले आहेत. तरी देखील काही रूम मालक भाडे वसुलीसाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकत आहे. या संकटकाळात रोजच्या अन्न-पाण्याची भ्रांत पडलेली असताना शेतकरी – कामगार – मजदूर अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कोरोनाकाळात हे भाडे देणे परवडणारे नाहीत. तशी वसुली करणे अन्यायकारक व विद्यार्थीविरोधी आहे. त्यामुळे आम्ही AAP युवा आघाडीच्या माध्यमातून विनम्रपूर्वक मागणी करतो की,


 १) जे रूम मालक विद्यार्थ्यांवर ‘भाडे द्या अन्यथा सामान घेऊन जा’ अशी धमकी देऊन दबाव टाकत असेल तर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करावी.

२) विद्यार्थी आणि रूम मालक यांच्यात जो काही भाडे करार झाला असेल त्यातुन  “एप्रिल २०२०” या महिन्या पासून ते प्रत्यक्ष शैक्षणिक कार्यक्रम चालू होईपर्यंत अर्थात त्या रूमचा प्रत्यक्ष वापर होईपर्यंतच्या मधल्या कोरोनाकाळातील महिन्यांना वगळावे.

3) विद्यार्थ्यांचे भाडे माफ करण्याच्या मुख्य हेतूसिद्धीसाठी रूम मालकांना सरकारने योग्य ते पॅकेज द्यावे अथवा योग्य ते पाऊल उचलावे.


दिल्लीमध्ये AAP सरकारने ज्या कोण्ही घर मालकाने भाड्याची मागणी केली आहे त्यांना सरकार तर्फे भाडे देण्यात आले आहे।
तसंच आपण सुद्धा महाराष्ट्र मध्ये केलं पाहिजे जिणें करून कोणाची गैरसोय होऊ नै । जर सरकार कामगार कायदे गुंडाळू शकते तर विद्यार्थ्यांना भाडेकरारात सूट का मिळू शकत नाही?कृपया आपण आमच्या या मागण्यांवर विद्यार्थीहितासाठी त्वरीत सकारात्मक निर्णय घ्याल ही अपेक्षा.

Share this: