संभाजीनगर उद्यानातील धोकादायक गवताची झाली साफसफाई; विजय जरे यांचा पाठपुरावा
पिंपरी (वास्तव संघर्ष): सध्या पिंपरी चिंचवड शहरातील विविध रोडच्या कडेला तसेच मोकळ्या विविध जागा व भुखंड या सर्वच जागी हे रान गवत वाढलेले असुन त्याचा परीणाम डासांचा प्रादुर्भाव वाढण्यावर तर होतोच शिवाय या रान गवताच्या जागी कचराही फेकला जातो, यामुळे शहर अस्वच्छ दिसते, हे शहराच्या सौंदर्यात बाधा आणते.
तसेच जॉगर्स पार्क संभाजीनगर चिंचवड उद्यानातील वाढलेले धोकादायक गवत व नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने साफसफाई त्वरित करण्याबाबत स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे यांनी गुलाब पुष्प उद्यानअधीक्षक यांना पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राची दखल घेऊन जॉगर्स पार्क संभाजीनगर चिंचवड उद्यानातील वाढलेले धोकादायक गवत तत्काळ काढण्यात आले आहे.
विजय जरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की,रोज सकाळी सदर उद्यानामध्ये चालण्याकरिता जात असतो. माझ्याप्रमाणे तिथं राजकीय, सामाजिक, तरुण मुले मुली शासकीय पोलीस भरती ज्येष्ठ नागरिक वगैरे नागरिकांना व्यायाम करण्याकरिता मोठ्या संख्येने येत असतात. परंतु सदर उद्यानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच गवत झाडे – झुडपे देखील दहा-दहा फुट वाढल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात भटके कुत्र्यांचा वावर देखील सुरू आहे. तसेच अचानकपणे दिसणाऱ्या सापामुळे देखील तिथे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच तिथे वाढलेल्या गवत झाडेझुडपामध्ये लपवून अनेक तरुण दारू किंवा गांजा ओढण्याकरिता देखील येत असतात. तसेच रोमियो (जोडप्यांकडून) कडून देखील मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. तरी आपण या सर्व गोष्टींचा गांभीर्याने लक्ष देऊन ते उद्यान नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम प्रकारे स्वच्छ करून व तेथे चालणाऱ्या गैरप्रकार त्वरित न थांबवल्यास किंवा तेथे एखादा गैरप्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार सदर बाबतीत संबंधित विभागाचे अधिकारी व तुम्ही स्वतः या जबाबदार रहाल.त्यानुसार पत्राची दखल घेऊन जॉगर्स पार्क संभाजीनगर स्वच्छ करण्यात आले आहे.