बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांचा आणि योगी सरकारचा रिपब्लिकन सेनेकडून निषेध

पिंपरी (वास्तव संघर्ष) : उत्तर प्रदेश येथील हाथरसमध्ये भगिनी मनीषा वाल्मिकी सामूहिक बलात्कार व निघृण हत्येचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने पिंपरीतील विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी निषेध करण्यात आला . पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धुराजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बहीण मनिषा वाल्मिक वर झालेल्या सामूहिक बलात्कार व निघृण हत्या करणाऱ्या नराधमांचा व योगी सरकाराचा जाहीर निषेध करण्यात आला.

या वेळी पुणे जिल्हाअध्यक्ष- सुनील ढसाळ, भारतीय बौध्द महासभा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष – बापुसाहेब गायकवाड, महिला अध्यक्षा-भिमाताई तुळवे, हौवसराव शिंदे, अरुण मैराळे, हिराभाऊ लांडगे, त्रिंबक मस्के, राहुल विटकर, गिरिश साबळे, वर्षाताई शेलार, पल्लवी वाघ, संगीता भंडारी, सलमा सैय्यद, राम भंडारी, आरुण रणदिवे, आशोक जावळे, शामराव जावळे अजय शेरखाने रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this: