हायकोर्टाच्या ‘त्या’ प्रकरणात महिलेला वैश्याव्यवसाय करण्याची धमकी

निगडी (वास्तव संघर्ष) : मुंबई हायकोर्टात चालू खटल्यामध्ये फिर्यादीला त्यांच्या विरूद्ध खटल्यात साक्ष देण्यापासून परावृत्त करण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी आणि आईला अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत अपमानस्पद शब्द वापरून मेसेजस पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एएका पुरुषाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी रविराज विकास ताकवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपीने बेकायदेशीरपणे फिर्यादी यांना त्यांच्याविरुद्ध मुख्यमहानगर न्यायदंडाधिकारी , एसप्लनेड कोर्ट मुंबई हायकोर्टामध्ये चालू असलेल्या खटल्यामध्ये साक्ष देण्यापासून परावृत्त करण्याच्या दुष्ट उद्देशाने फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचे मोबाईलवर अश्लील व गलिच्छ भाषेत मेसेजेस पाठवले आहेत . तसेच त्याने मोबाईलवर फिर्यादी यांची पत्नी व आईच्या चारित्र्याबाबत अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषेत अपमानास्पद शब्द वापरून मेसेज पाठवले व फिर्यादी यांचे पत्नीचे चारित्रहनन करण्याच्या दुष्ट हेतूने त्याने “आता वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे, म्हणून तुझ्या पत्नी तो स्वतःचा व्यवसाय करू दे” असे अश्लील भाषेत व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून ते मेसेज फिर्यादी यांचे पत्नीने वाचल्याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होवुन तिचा विनयभंग करून त्याने लैंगिक भावना उद्दिपित करून अश्लील मजकूर इलेक्ट्रानिक स्वरूपात फिर्यादी यांचे व्हॉट्सअॅपवर पाठवला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: