क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महिला पोलीसाला जबरदस्तीने रिक्षात ओढणे पडले महागात

भोसरी (वास्तव संघर्ष) : भरधाव वेगात वेडीवाकडी व इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने रिक्षा चालवणा-याला महिला पोलिसाने हटकले म्हणून याचा राग मनात धरून महिला पोलीसाला जबरदस्तीने रिक्षामध्ये ओढले आहे. ही घटना मंगळवारी (दि.22) रोजी सव्वानऊच्या सुमारास भारतमाता चौक मोशी येथे घडली आहे.

याबाबत एका महिला पोलीसांनी एमआयडीसी भोसरी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्वदिप भरत मादलापुरे( वय-19),अभिषेक बाळासाहेब पोळ( वय-19),सुनिल शिवाजी कसबे (वय-20 सर्व रा बनकर वस्ती,मोशी) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी यांनी संगणमत करुन ( एम.एच. 14 एच. एम. 5771) ही ॲटोरिक्षा भरधाव वेगात वेडीवाकडी व इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने चालवत असताना फिर्यादी यांना दिसल्याने फिर्यादी यांनी त्यांना आवाज देवुन ॲटोरिक्षा व्यवस्थित चालविण्यास सांगितले.

माञ आरोपींनी ॲटोरिक्षा तशीच भरधाव वेगाने पुढे घेऊन गेले त्यांनंतर भारतमाता चौकात सिग्नल लागल्याने व पुढे रहदारी असल्याने त्यांनी त्यांची ॲटोरिक्षा  थांबविली असता फिर्यादी त्यांच्या गाडीवरुन उतरुन यातील आरोपींना’ मी पोलीस आहे असे सांगुन त्यांना ॲटोरिक्षा व्यवस्थित चालविण्यासाठी सांगितलं मात्र हे ऐकताच ॲटोरिक्षाच्या पाठीमागे बसलेल्या दोन आरोपींनी फिर्यादीचा  हात पकडुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न करुन जोरात जबरदस्तीने ॲटोरिक्षामध्ये ओढले व फिर्यादी यांना घेवुन  ॲटोरिक्षा तशीच पुढे पळवून नेली होती. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करित आहेत.

Share this: