वायसीएम रुग्णालयात मानधनावर असलेले डॉ . राजेंद्र वाबळे झाले कायमस्वरूपी अधिष्ठाता
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेच्या ( पी . जी . इन्स्टिट्यूट ) अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे यांची पालिका आस्थपनेवर खुल्या वर्गात कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे . तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी ( दि .२८ ) दिले आहेत . डॉ . वाबळे यांची मानधनावर २ वर्षांसाठी अधिष्ठातापदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती . त्यांची या पदावर कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आली आहे .
इन्स्टिट्यूच्या पदांसाठी पालिकेने जाहिरात प्रतिद्ध केली होती . उमेदवारांची मुलाखत घेतली . त्यात डॉ . वाबळे यांची निवड झाली . निवडीस विधी समितीने १२ जूनला तर , सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्टला मंजुरी दिली आहे . त्या प्रस्तावाला आयुक्तांनी २५ सप्टेंबरला मान्यता दिली . त्यामुळे डॉ . वाबळे हे आता कायमस्वरूपी अधिष्ठाता झाले आहेत .